Posts

Showing posts from February, 2017

एक वाटी दही

पंचेचिळीशितल्या एका तरुणाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यु होतो. बर्‍याच लोकांनी त्याला दूसर्‍या लग्नाचा सल्ला दिला परंतु "माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर भेट दिली आहे, त्याच्या पालन पोषणातच माझे ऊर्वरीत आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन" असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने टाळले. बघता बघता दिवस गेले मुलगा मोठा झाला आता पितापुत्र दोघे मिळून व्यवसाय करु लागले, मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपली सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन, जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले. हे महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या आॅफिस मध्ये, कधी मुलााच्या आॅफिस मध्ये असा ईथे तिथे आपला वेळ व्यतीत करु लागले, थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली.आता तर हे महाशय अगदी निश्चिंत झाले. बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी हे महाशय घरी दूपारच्या जेवनास बसले, त्याचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना यांनी आपल्या सुनेला दही मागितले, यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले. जेवण झाले हे हात धुवून दिवानखाण्यात सोफ्यावर बस