ब्रिटिश आणि भारतीय मानसिकता

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीने ब्रिटनचे साखरेने भरलेले जहाज बॉम्ब टाकून समुद्रात बुडवले, ब्रिटिश रेडीओने जनतेला अवाहन केले की काही दिवस साखरेचा तुटवडा भासणार आहे. तेंव्हा जनतेने काय केलं माहित आहे?
ज्याच्या घरी जास्त साखर आहे त्यांनी काही आठवड्याचा साठा ठेवून उरलेली साखर दुकानदाराला परत केली जेणेकरून ती गरजूंना मिळावी आणि देशबांधवांना अडचण येणार नाही. दुकानदारांनी पण काळाबाजार न करता ती साखर आहे त्या भावाने विकून टाकली. हे कारण आहे की अजुन पर्यंत कोणी ब्रिटनला गुलाम करु शकले नाही. 'Rule Britannia rule the waves Britisher will never slaves' अशी प्रजा असलेला देश बलशाली असणारच ना! मीठ तुटवड्याच्या एका अफवेने देशाच्या जनतेचे चारित्र्य उघड पाडले.
देश महान करण्याची जबाबदारी फक्त सरकारची नाही तर त्यात जनतेचे पण योगदान असावे लागते, विश्वगुरु बनण्यासाठी अगोदर त्या योग्यतेच बनावे लागते बोलक्या पोपटासारखे फक्त वंदेमातरम बोलुन भारत विश्वगुरु होणार नाही.
आपल्याला त्या योग्यतेच बनावे लागेल आपले विचार पण व्यापक बनवावे लागतील.

Abhishek Thamke

Hope you like this article. Feel free to share this on your Social Media.

No comments:

Post a Comment

Instagram Updates